मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पालघरमध्ये 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'अमितच्या लग्नाइतकंच समाधान आणि आनंद या सोहळ्याने मिळाला' अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी ट्विटरवरुन व्यक्त केली.

पालघरमध्ये 500 आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. मनसेच्या अविनाश जाधव, कुंदन संखे आणि इतर कार्यकर्त्यांनी हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होते.

'नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला. पक्षातर्फे पालघर येथे आयोजित 500 आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्नसोहळा. ह्याबद्दल पक्षाचे अविनाश जाधव, कुंदन संखे आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन आणि नव-दाम्पत्यांना शुभेच्छा.' अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.


राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे 27 जानेवारीला परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.