Raj Thackeray : मनसेसकडून अक्षय तृतीयानिमित्त होणारे महाआरतीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यभरात होणारे महाआरतीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.  


उद्या अक्षयतृतीया आहे. त्यानिमित्ताने मनसेकडून राज्यभर महाआरतीचे कार्यक्रम करण्यात यावे असे राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबदच्या सभेत सांगितले होते. त्यानुसार उद्या राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाआरती करणार होते. परंतु, राज  ठाकरे यांच्या आवाहनानंतर आता मनसेचे महाआरतीचे कार्यक्रम होणार नाहीत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे.  


मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाहीत तर राज्यातील मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालिसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी काल त्यांच्या औरंगाबादमधील सभेत घेतला होता. परंतु, उद्या रमजान ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी महाआरती करण्याच आपला निर्णय मागे घेतला आहे. या सोबतच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी दिलेला 3 मे च्या अल्टिमेटममध्ये देखील बदल केला आहे. 3 मे नंतर आता राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास 4 मे चा अल्टिमेटम दिला आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे? 
"उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं? हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन. असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.  



महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भाषणावरुन काय कारवाई होऊ शकते? घटनातज्ञ उल्हास बापट सांगतात...


Hanuman Chalisa Row : चला अयोध्या! 'या' तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर, मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी