सुरुवातीला राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यात मोठं मैदान उपलब्ध होत नव्हतं. अखेर मोठी शोधाशोध केल्यानंतर हा मैदानाचा प्रश्न मार्गी लागला. आज (9 ऑक्टोबर)पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील सरस्वती संस्थेच्या मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज यांची सभा होणार होती. या सभेद्वारे राज ठाकरे मनसेच्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार होते. परंतु पावसाने राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.
राज ठाकरेंची पुण्यात सभा, मात्र मैदानात चिखलाचं साम्राज्य | ABP Majha
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले नव्हते. परंतु राज यांनी निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. 'लावरे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून राज यांनी सत्ताधारी भाजपची पोलखोल केली होती. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे काय नवीन बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाने 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने या पत्राद्वारे केली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारली. परिणामी 5 ऑक्टोबरला होणारी राज ठाकरे यांची सभा पुढे ढकलण्यात आली. तसेच सभेसाठी पक्षाला दुसऱ्या मैदानांची शोधाशोध करावी लागली होती.
10 आणि 11 तारखेला राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार | ABP Majha