MNS Avinash Jadhav on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासूनमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहाभागी झाले आहेत. पण या गर्दीच्या मुद्यावरुन काहीजण टीका करत आहेत. यावर मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोडासा त्रास झाला तरी अभिमानान सहन करु, मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचे अविनाश जाधव म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव?

रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो हा मुंबईकर. आता आपले हक्काचे मराठी भाषिक आले आहेत. त्यात वावग काय आहे थोडासा त्रास झाला तरी अभिमानान सहन करु असे अविनाश जाधव म्हणाले. माझे राज साहेब नेहमीच सांगतात मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे असे जाधव म्हणाले. 

 

आंदोलन हाताबाहेर गेलं, उच्च न्यायालयाचं निरीक्षण

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून आज (1 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच सदर याचिकेवर उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या आदेशाच पालन झालं की नाही ते राज्य सरकारला न्यायालयात सांगाव लागणार आहे. तसेच सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत, उच्च न्यायालयाचे आदेश

मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळं ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत असे उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश देखील उच्च न्यायालयानं दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

High Court On Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मुंबई उद्या दुपारपर्यंत रिकामी करा, आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका, हायकोर्टाचे सरकारला आदेश; उच्च न्यायालयात खडाजंगी, काय काय घडलं?, A टू Z माहिती