ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2025 | सोमवार 

1. मुंबई उद्या दुपारपर्यंत रिकामी करा, मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका, हायकोर्टाचे सरकारला आदेश; मनोज जरांगेच्या आंदोलनावरुन उच्च न्यायालयात खडाजंगी https://tinyurl.com/mts3wwvr  कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची, मुंबईतील आंदोलन हाताबाहेर गेलं; उच्च न्यायालयाकडून कानउघडणी https://tinyurl.com/649p5yfx  अटींचे उल्लंघन केलंय तर जरांगेंना आंदोलन थांबवण्यास का सांगत नाही? हायकोर्टाकडून फडणवीस सरकारला प्रश्नांची सरबत्ती, कोर्टात नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/46n5fy27  

2. मराठा आंदोलकांनी फक्त दक्षिण मुंबई नाही, अख्खी मुंबई रोखून धरली; गुणरत्न सदावर्तेंचा उच्च न्यायालयात दावा https://tinyurl.com/rnc68x3h  आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणताहेत, कारवाईचे आदेश द्या; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप https://tinyurl.com/43keej25  हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी, मनोज जरांगेंच्या वकिलांनाही सूचना; उच्च न्यायालयातील 10 महत्त्वाचे मुद्दे https://tinyurl.com/3hx9p4nr 

3. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काही लोकांनी धूडगुस घातला, त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नंतर उपाशी ठेवल्याचा आरोप केला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/y48txsmw  मंत्रालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध https://tinyurl.com/2p9jsb49  मुंबईत ओबीसी नेते एकवटले, भुजबळांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध https://tinyurl.com/2s4e8mt5 

4. आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, इतकं मोठं आंदोलन उभं राहिल्यावर 250 आमदार असूनही शरद पवार केंद्रबिंदू म्हणतात; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/y2jvhw95   जरांगेंच्या आंदोलनामागे पवार साहेबांचा हात असेल तर सिद्ध करून दाखवा; शरद पवार गटाचं सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान https://tinyurl.com/4k8x9mka   सहन होतंय तोपर्यंत आपल्या व्यासपीठावर येणाऱ्याचा सन्मान करा, गोंधळ घालू नका, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन  https://tinyurl.com/4bv5jemu 

5. मुंबईतील मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका; मनसे नेते अमित ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश https://tinyurl.com/ymhafe9z  आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम द्या, मनसेची मागणी; राज ठाकरेंवरील टीकेलाही बाळा नांदगावकरांचे प्रत्त्युतर https://tinyurl.com/4wycv3va   मनसेतून बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकरांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भाजपमध्ये करणार प्रवेश https://tinyurl.com/2jk46uw9 

6. मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा, जिथं जातात तिथं आग लावतात; धर्माच्या नावाखाली राजकारण समाजासाठी हानिकारक; नितीन गडकरींकडून पुन्हा खडेबोल https://tinyurl.com/btumhhd5 

7. मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा; विरोधातील याचिका फेटाळल्या https://tinyurl.com/mwjtbssn   पुणेकरांसाठी गुडन्यूज, सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला; सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते उद्घाटन https://tinyurl.com/4apr669k 

8. घरातील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस; 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळले; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सोलापुरातील घटना https://tinyurl.com/4ceaze5j  मित्रांसोबत गणपती विसर्जनाला गेला, नदीत तोल जाऊन वाहून गेला, सोलापुरात तरुणाचा दुःखद शेवट https://tinyurl.com/ms9kcfna  शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने गळ्याला दोर लावला; नागपुरातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/2bu3286k 

9. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा, दहशतवाद, व्यापार ते सीमेवरील शांतता यावर दोन्ही देशांचं एकमत, परराष्ट्र मंत्रालयाची महत्वपूर्ण माहिती  https://tinyurl.com/3aczbjde  भारतात सर्वात जास्त नफा ब्राह्मण कमावतायत, मोदींचा चीन दौरा सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचे सनसनाटी दावे; टॅरीफबाबतही भाष्य https://tinyurl.com/yc758mz9  अफगाणिस्तानात भूकंपाने भयाण अवस्था, झटक्यात सगळं उद्ध्वस्त, 800 नागरिकांचा मृत्यू, 2500 जण जखमी https://tinyurl.com/54dpt73c 

10. जय शाहांचा ऐतिहासिक निर्णय! प्राईज मनीत तब्बल 297 टक्क्यांनी वाढ, महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 40 कोटी रुपये मिळणार  https://tinyurl.com/yeyv3rxc  18 वर्ष जुना व्हिडिओ बाहेर काढणं चुकीचं, हे एखाद्या स्वार्थी हेतूनं केलं गेलंय; श्रीसंतला कानशिलात मारल्याचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर हरभजनची सिंगची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/58p48bhv 

एबीपी माझा स्पेशल 

भारताच्या तिजोरीत मोठी भर! महिनाभरातच जमा झाले 1.86 लाख कोटी, GST संकलनात मोठी वाढ   https://tinyurl.com/44tct5hf 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w