जळगावात मनसेला खिंडार, सर्व 12 नगरसेवक सुरेश जैन गटात

सर्वच्या सर्व 12 नगरसेवक सुरेश जैन यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान महापौर ललित कोल्हे यांनी ही माहिती दिली.

Continues below advertisement
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या अगोदर जळगावात राज ठाकरे यांच्या मनसेला मोठी खिंडार पडली आहे. सर्वच्या सर्व 12 नगरसेवक सुरेश जैन यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान महापौर ललित कोल्हे यांनी ही माहिती दिली. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहेत. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचीही तयारी खान्देश विकास आघाडीने केली असल्याची माहिती सुरेश जैन यांनी दिली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी करुन निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी दिली. जळगाव महापालिका निवडणूक कार्यक्रम सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. जळगाव महानगरपालिकेची मुदत 19 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. जळगाव शहराची एकूण लोकसंख्या - 4 लाख 60 हजार 228 मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15 प्रभाग - 19 जागा - 75 आरक्षण - महिलांसाठी 38 जागा, अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4 , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20  जागा राखीव आहेत. संबंधित बातम्या :

दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र, सुरेश जैन आणि खडसेंचं स्नेहभोजन

Continues below advertisement

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : सुरेश जैन

सुरेश जैनांच्या वापसीनंतर खडसे विरोधकांचे ध्रुवीकरण सुरु

घरकुल घोटाळा : ४ वर्षे ५ महिने ३ दिवसांनी सुरेश जैन तुरुंगाबाहेर येणार

जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola