सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शनिवारी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या घटनेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आज (रविवार) माजी खासदार निलेश राणे कुडाळ येथील भाजप कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांवर टीका करत कालच्या प्रकरणाला आमदार वैभव नाईक यांच्यासह पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप केला. सेनेच्या सर्व मंत्र्यांना जेल जवळ दिसत असून जेलमध्ये जायचं नसल्याने त्यांना भाजपसोबत जुळवून घेण्यासाठी आपल्याच पक्षप्रमुखांना पत्र लिहून सांगाव लागतंय. मात्र, यांना माफी नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री हे नामधारी मुख्यमंत्री असून राज्य सरकार अजित पवार चालवत असल्याचा टोला देखील निलेश राणे यांनी लगावला.


काल शनिवारी कुडाळमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनी जे केलं ते नाटक म्हणावं लागेल. वैभव नाईक यांनी राडा नाही तर चिंधेगिरी केली. सेनेच्या वर्धापनदिनी पोट भरून आमदार वैभव नाईक यांचा कचरा झाला. करायला काहीतरी भलतंच आला होता. मात्र, पोलिसांच्या गराड्यात आला आणि पळाला. ज्या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले, त्याच दरात वैभव नाईक त्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल विकतो. मग आंदोलन कसलं. तो एक स्टंट होता जो फसला.


हिंमत असेल तर मैदानात या, वैभव नाईकांचे नितेश राणेंना आव्हान तर मैदान तुमचं, वेळ जाहीर करा, भाजपचं प्रतिआव्हान


आम्ही ठरवून जरी केलं असतं की आज वैभव नाईक यांचा कचरा करू, तरी देखील झालं नसत ते त्यांनी स्वतः करून घेतलं. पक्ष त्यांच्याबरोबर नाही, कसलं आंदोलन आणि कसलं काय? ज्यांच्यामुळे वैभव नाईक याचा डाव फसला त्यांच अभिनंदन करायला आलो. वैभव नाईक यांची औकात असती तर उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्री केला असता. उद्धव ठाकरेंना सुध्दा माहिती आहे हा बिन लायकीचा आहे. त्यामुळे गेली दोन टर्म त्याला पालकमंत्री पद दिलं नाही. सरकारच्या पैशावर आणि उद्धव ठाकरे यांनी टाकलेल्या पैशावर जिवंत असलेला हा आमदार आहे वैभव नाईक. उधारी पाहिजे होती राणेंच्या पंपावर तर मागून घेतली पाहिजे होती आम्ही दिली असती. 


प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळत घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. भाजपशी जुळतं घेतल्यास शिवसेनेला त्याचा फायदा होईल असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया असे विचारले असता ते राणे म्हणाले, की प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागली. यांचे सगळे मंत्री आहेत, त्यांना जेल जवळ दिसतेय म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जेलमध्ये जायचं नसेल तर काय करायचं? भाजपसमोर गुडघे टेका. आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागतील. त्यांना माफी नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.


अजित पवार राज्य चालवतायेत ही नवीन गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतोय. राज्य अजित पवार चालवतायेत. उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत, त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. सत्ता चालवतायेत अजित पवार, हे संपवणार आहेत.


वैभव नाईक सत्तेचा गैरवापर करतोय. जर पेट्रोल पंपावर असं काही घडल्यास जबाबदारी तुमची अशी नोटीस बजावली होती. तरीदेखील पोलिसांनी काही केलं नाही. पोलिसांना घेऊनच वैभव नाईक आला. म्हणजे पोलीस त्याच्याबरोबर आहेत. कालच्या प्रकरणात वैभव नाईक जेवढे कारणीभूत आहेत, तेवढेच पोलीस जबाबदार आहेत. खासकरून याठिकाणचे पोलीस निरीक्षक जबाबदार आहेत. वैभव नाईक यांच्यावर 356 गुन्हा का दाखल झाला नाही. आम्ही कोर्टातून व्याय मागू. त्यात पोलिसांना सुध्दा व्यायालयात खेचणार. वैभव नाईक पोलीस निरीक्षकांच्या अंगावर जाऊन पोलीस म्हणतात अंगावर आले नाहीत. म्हणजे पोलीस आणि ते एकत्र आहेत.