Shahajibapu Patil on Ajit Pawar : अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत असा टोला सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना आता का काहीच काम उरले नाही. ते विरोधी पक्षनेते झालेत पण ते कायम सत्तेत राहत असल्यानं नेमकं काय करायचे हेच त्यांना कळत नसल्याचे शहाजी पाटील म्हणाले. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल देखील शहाजीबापूंना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, सांगोल्यातून 15 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी बिकेसी मैदानावर जाणार आहेत.
पुढचे 15 वर्षे शिंदे-फडणवीस यांचेच सरकार राहणार
पवार यांनी कितीही राज्याचे दौरे केले तरी पुढचे 15 वर्षे शिंदे-फडणवीस यांचेच सरकार राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. एस काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंत राजकारणात आहेत तरी कधी 50 आमदारांच्या पुढे आकडा का गेला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आर आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्यामुळं एकदा 55 ते 60 पर्यंत आमदारांची संख्या पोहोचली होती, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना शहाजी पाटील यांनी टोला लगावला.
पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं
दसरा मेळाव्याला पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणाऱ्यांनी BKC मैदानावर यावं असेही शहाजी पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळणार असल्याचे शहाजी पाटील म्हणाले. यावेळी शहाजी पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. अजित पवार यांना आता भाषणे ऐकण्याशिवाय काही काम राहिलं नसल्याचे शहाजी पाटील म्हणाले. दादा कायम खुर्चीवरच होते. ते आता विरोधी पक्षनेते झालेत, त्यांना कसे काम कळावे कळेनासे झाले आहे. त्यांच्या मनातले पवार साहेबांना देखील कळत नाही. त्यामुळं दादा कझी झटका देतील हे सांगता येत नसल्याचे शहाजी पाटील म्हणाले.
शहाजीबापू पाटलांच्या डायलॉगची राज्यभर चर्चा
आमदार शहाजीबापू पाटील हे शिवसेनेमधील अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. जितकी चर्चा सत्तांतराची झाली, नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, शिवसेनेतील नाराजीची झाली. त्यापेक्षा जास्त शहाजीबापूंचा डायलॉग फेमस झाला. काय डोंगार, काय झाडी काय हॉटेलचा या त्यांचा डायलॉग फेमस झाला. त्यावर गाणेही आले. सोशल मीडियावर या डायलॉगची चर्चाही रंगली होती.
महत्त्वाच्या बातम्या: