Rohit Pawar :  अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीच्या प्रस्तावारुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलाच नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले होते. त्यावर आम्ही आवाज उठवला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तरे 30 ते 35 दिवस आधीच तयार केले जात असल्याचे सांगत विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता असे रोहित पवार म्हणाले. परंतु आज सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे 27 नोव्हेंबरला पाठवल्याचे सत्य समोर आणत मुख्यमंत्र्याना त्यादिवशी खोटी ब्रीफिंग झाल्याचे सिद्ध केले. असो राज्य सरकार यापुढे असा निष्काळजीपणा करणार नाही, ही अपेक्षा असे रोहित पवार म्हणाले. 

Continues below advertisement

राज्य सरकारकडून गंभीर निष्काळजीपणा

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या नियमांनुसार मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्तावच न पाठविल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलाच नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तरे 30 ते 35 दिवस आधीच तयार केले जात असल्याचे सांगत विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता असे रोहित पवार म्हणाले. मात्र, आज सभागृहात बोलताना अजित पवार यांनी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे 27 नोव्हेंबरला पाठवल्याचे सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. 

मविआच्या 25 खासदारांकडून शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव 

महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मागणारा प्रस्ताव आला आहे असे असत्य विधान शिवराज सिंह चौहान यांनी केल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्क भंग दाखल केला आहे. हक्कभंगाच्या प्रस्तावावर खासदार सुप्रिया सुळे, शाकदार अरविंद सावंत वर्षा गायकवाड अनिल देसाई प्रतिभा धानोरकर बळवंत वानखेडे कल्याण काळे संजय दिना पाटील रवींद्र चव्हाण अमर काळे प्रशांत पडोले शामकुमार बर्वे बजरंग सोनावणे निलेश लंके प्रणिती शिंदे संजय जाधव भाऊसाहेब वाकचौरे धैर्यशील मोहिते पाटील शोभा बच्छाव राजाभाऊ वाजे वर्षा गायकवाड भास्कर भगरे अशा एकूण 25 महाविकास आघाडीच्या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

ओमराजे संतापले, मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणणार; अतिवृष्टी अनुदानावरुन दिल्लीत ठाकरेंच्या खासदाराची डरकाळी