Rohit Pawar : गुलाबी गॅंगने पैशाची उधळपट्टी कशी लावलीय, हे आपण पाहत आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जनसन्मान यात्रेवर (Jansanman Yatra) टीका केली. सरकारच्या पैशावर हे यात्रा काढतात, गर्दी गोळा करतात. यात्रा काढण्यासाठी जी एजन्सी आहे, त्या डिजाईन बॉक्सला अजितदादांच्या पक्षाने 200 कोटी रुपये दिल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. ते इंदापूरध्ये बोलत होते.  


आम्हाला गुलाबी वादळाची आम्हाला चिंता नाही 


अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज इंदापूरमध्ये दाखल झाली. याबाबत रोहित पवार यांनी विचारले असता त्यांनी यावर जोरदार टीका केली. आशाताई अंगणवाडी सेविकांना दम देऊन लोकांना आणायला सांगितले होते असेही रोहित पवार म्हणाले. आम्हाला गुलाबी वादळाची आम्हाला चिंता नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. पण आज या सरकारने नीट न काम केल्यामुळं जे वादळ आला आहे ते मिटवण्यासाठी आज आम्ही इथे सगळे लढत आहोत असंही रोहित पवार म्हणाले.


समरजित घाडगेंनी योग्य निर्णय घेतला


समरजित घाडगेंनी जसा निर्णय घेतला तसा निर्णय इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील घेतील का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, हा निर्णय पवार साहेबांच्या माध्यमातून केला जातो. समरजित घाडगे आमच्या पक्षाते आले त्यांचं मी स्वागत करतो, त्यांनी योग्य निर्णय घेतल्याचे रोहित पवार म्हणाले. इतर दुसऱ्या कुठल्या मतदारसंघाबाबतचा निर्णय हा शरद पवार घेतील असेही रोहित पवार म्हणाले. 


आम्ही कोर्टाच्या निकालाचा आदर करणारी माणसं 


बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदच्या संदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की, आपण कोर्टाच्या निकालाचा आदर करणारी माणसं आहोत. जे या महाराष्ट्रमध्ये घडत आहे. महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहेत, सरकार त्याबाबत काही करत नाही, असे रोहित पावर म्हणाले. 
त्याबाबतच्या लोकांना स्वेच्छेने बंद ठेवायचा आहे ते ठेवू शकतील असेही रोहित पवार म्हणाले. 


सिक्युरिटी वाढवण्याची वेगवेगळी कारणे असतात


शरद पवार यांना देण्यात येणाऱ्या झेड प्लस सिक्युरीटाबाबत रोहित पवारांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, पवार साहेबांनी त्याबाबत उत्तर दिलं आहे. सिक्युरिटी वाढवण्याची वेगवेगळी कारणे असतात. समिती असते समितीला वाटलं असेल. पण साहेब कोणाला भेटतात का? ही माहिती काढण्याचा हेतू असेल तर ते फार चुकीच असल्याचे रोहित पवार म्हणाले. 


भाजपची प्रवृत्ती फार वेगळी 


भाजपची प्रवृत्ती फार वेगळी आहे. त्यांच्या मित्र पक्षाच्या जागेवर सुद्धा बीजेपी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करेल असे रोहित पवार म्हणाले. हे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा कळालं होतं. शिंदे साहेब आणि अजितदादांना याबाबत काय कळालंय आणि ते काय निर्णय घेतात हे बघावं लागेल असंही रोहित पवार म्हणाले. इंदापूरच्या माजी आमदारांना काय वाटतं हे मला सांगता येणार नाही. भाजप नेत्यांना विधानपरिषद देतो हेही सांगितलं आहे, पण ती दिली नाही भाजप हा शब्द न पाळणारा पक्ष असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. आता त्यांना मते पाहिजी आहेत. म्हणून ते इथे आले होते अशी टीका रोहित पवारांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर केली. अंगणवाडी सेविका आशा सेविकांना विचारलं तर त्यांना धमक्या दिल्या होत्या. गेले पंधरा दिवस प्रशासकीय अधिकारी महिला गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत असे रोहित पवार म्हणाले. 


महिलांच्या बाबतीत अपशब्द काढणं अयोग्य


कुठल्याही महिलांच्या बाबतीत कोणी अपशब्द काढत असेल तर ते योग्य नाही. ही आपली संस्कृती नाही. मेहबूब शेख चित्रा वाघ यांच्याबाबत काय बोलले ते मला माहित नाही असे रोहित पवार म्हणाले. आपण संविधानिक भाषेत उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं असंही ते म्हणाले. नितेश राणे यांना सागर बंगल्याचा पाठिंबा आहे, हा पाठिंबा गरिबाला का नाही? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. 


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला; राज्यसभा निवडणुकीसाठी अजितदादांचा शिलेदार ठरला!