Nitesh Rane : आम्हाला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते मस्ती करत आहेत. त्यांचेच नातवाईक असा धिंगाणा घालत असतील तर राज्यातील जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडून अपेक्षा ठेवावी असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला आहे. हा नामर्दणपणाचा प्रकार सुरु असल्याचे नितेश राणे म्हणाले. तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असेही राणे म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशाराही राणे यांनी दिला.
फक्त 24 तास गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील राणेंनी दिला. आम्ही विचारांची लढाई विचाराने करु, दगडाची भाषा दगडाने करु असेही राणे यावेळी म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असे राणे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप राणेंनी केला. तुम्हाला आमच्या जीवापर्यंत यायचे असेल तर आम्हालाही जीवाचे संरक्षण करायचे आहे. ही राजकीय लढाई नाही, कारण राजकीय लढाई ही व्यासपीठावर लढली जाते. हे सध्या अघोषीत गँगवार सुरु असल्याचे राणे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता काही काम राहिले नाही. राणेंचे घर कधी पाडणार, सोमय्यांवर कधी केस टाकणार, दरेकरांना कसे अटकवणार हेच मुख्यमंत्र्यांचे काम राहिले आहे असे राणे म्हणाले. यावेळी नितेस राणेंनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटायला गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. तसेच ते जखमी झाले. यावरुन सध्या विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.