बीड: गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवारांच्या पाठिशी पंकजा मुंडे उभ्या राहिल्या आहेत. आमदार लक्ष्मण पवारांविरोधात अॅट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं अविश्वसनीय असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचे निर्देश आपण दिल्याचं पंकजांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात सांगितलं.
काही दिवसांपूर्वी गेवराईत अतिक्रमण हटवताना बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर आमदार लक्ष्मण पवारांवर अॅट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर गेवराईत बंद पाळण्यात आला.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसाचा अवधी देत कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. यावर सखोल तपासानंतरच कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
बीडमधील गेवराईच्या भाजप आमदारावर विनयभंग, अॅट्रॉसिटीचा गुन्हा