मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (MLA Disqualification)  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  कठोर पाऊल उचलले आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar)  कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधीमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी  ओव्हरटाईम  करावा लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर दिसत आहे. हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरु असताना  अपात्रता सुनावणी घ्यावी लागणार आहे. एकाचवेळी अधिवेशन आणि सुनावणीचे काम अध्यक्षांना पाहावे लागणार आहे.  हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे.


चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification) फैसलाही 31 जानेवारीपर्यंत द्यावा, असेही सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक (Scedule)  सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसारही आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे हे नवे वेळापत्रकही फेटाळत आता सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत कोणत्याही परिस्थितीत ही सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश दिले. 


विधानपरिषद विरोधी पक्ष नेते नार्वेकरांच्या भेटीला


ठाकरे गटाचे आमदार विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची  विधानभवनात आज दुपारी  भेट घेणार आहेत.  सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात ही भेट असणार आहे.  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर ऑर्डर कॉपी आली नाही असं माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अध्यक्ष यांना कोर्टाची प्रत आम्ही देणार आहोत असं म्हटलं होत. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे आमदार विधानभवन येथे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  यांना भेटणार आहेत.


हे ही वाचा :