अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच जालन्यातून परत येऊ, असा पण बच्चू कडू यांनी केला आहे..
रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांआधी शेतकऱ्यांना 'साले' म्हणून संबोधलं होतं. त्यांनी संबोधलेल्या या वाक्याचा आमदार बच्चू कडू यांनी जाहीर निषेध केला होताच, तर शेतकऱ्यांना साले संबोधणाऱ्या दानवेंच्या विरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवू, असंही त्यांनी जाहीर केलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
“दानवेंचा मतदारसंघ बिहारपेक्षा वाईट”
जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करतानाच, बच्चू कडू यांनी दानवेंवर टीकाही केली आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट आहे. तिथे रेती तस्करी चालते, तसेच अवैध दारु विक्रीमध्येही दानवेंचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करुनच परत येणार : बच्चू कडू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2018 09:26 AM (IST)
जालन्यातून लोकसभा निवडणूक केवळ लढणारच नाही, तर रावसाहेब दानवेंना चितपट करुनच परत येऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -