Bacchu Kadu : पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात तुमचे नाव राहिलं, असे आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले असल्याची माहिती प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी दिली. राजकारणामध्ये कभी खुशी कभी गम हे सुरुच असते. राजकारणात योग्य वेळी योग्य घाव मारावाच लागतो असेही कडू म्हणाले. मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही याची मला खंत असल्याचे देखील कडू यावेळी म्हणाले. पहिल्या पंक्तीत बसवलं असतं तर आमचा सन्मान अधिक वाढला असता असेही यावेळी कडू यांनी सांगितले.


हुद्दा महत्वाचा नाही तर मुद्दा महत्वाचा


मंत्रींमडळात स्थान न दिल्यामुळं मी फार नाराज आहे असे नाही. पण मला खंत असल्याचे कडू यावेळी म्हणाले. मंत्री हा विषय माझ्यासाटी महत्वाचा नसल्याचेही कडू म्हणाले. राज्यात अपंग कल्याण मंत्रालय स्थापन करावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. पुढचा मंत्रीमंडळ सप्टेंबरमध्ये होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू म्हणाले. हुद्दा महत्वाचा नाही तर मुद्दा महत्वाचा असल्याचंही ते म्हणाले. मुद्दा नसेल तर हुद्द्याला काही किंमत नसते असेही कडू म्हणाले.


दिव्यांग मंत्रालय स्थापन करा, पहिला मंत्री मला करा


कोणत्या मंत्रीपदासाठी तुम्हा आग्रही आहात असाही प्रश्न बच्चू कडू यांनी विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, दिव्यांग मंत्रालय स्थापन करा आणि पहिला मंत्री मला करा. सर्व अपंग बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करु असेही ते म्हणाले. 18 जणांनी शपथ घेतली आहे. आता त्याबाबत काय बोलणार असेही ते म्हणाले. शपथविधी आधी विचारले असते तर मी बोललो असतो असेही ते म्हणाले. संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप सिद्ध झाले तरच विरोधाला अर्थ असल्याचे कडू यावेळी म्हणाले. नुसता कोणी आक्षेप घेतला म्हणून संधी न देमं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले. 


मुद्यासाठी लढू


मंत्रीमंडळात कोणाला संधी द्यायची कोणाला नाही हा दोन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय आहे. त्यावर मी काय बोलणार असेही कडू म्हणाले. प्रत्येक गोष्टीवर राजकारणात मत व्यक्त करावेच असेही काही नाही असेही कडू यावेळी म्हणाले. बच्चू कडू काय मंत्रीपदाशिवाय जगू शकत नाही का? मंत्रीपद दिलं तरी चांगल नाही दिलं तरी चांगलं असेही त्यांनी सांगितले. बच्चू कडू मंत्रीपदासाठी अडून कधी बसणार नाही. मुद्यासाठी लढू असं त्यांनी सांगितले. 


 


महत्त्वाच्या बातम्या: