kolhapur Crime : अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयिताला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी व युवक संकेश्वरजवळ काल गुन्हे शाखेला सापडले होते. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरचं वातावरण या संपूर्ण प्रकरणामुळे ढवळून निघालं होत. या मुलीच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक तैनात करण्यात आले होते.
कोल्हापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या एका पथकाने युवक व मुलीस बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेतले. काल दिवसभर आंदोलन आणि मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. याप्रकरणी संशयित 22 वर्षीय तरुणावर जुना राजवाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या 17 दिवसांपासून ही मुलगी आणि तिच्या सोबतचा मुलगा बेपत्ता होते. ही मुलगी अल्पवयीन असून तीच वय 14 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यातच आज याप्रकरणी आंदोलन देखील झालं. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यथाईकानी उपस्थित होते. तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोल्हापूरची ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि मुलगा गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या