जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात वेगाने वाढत 692 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 77 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, असे असले तरी कोविड रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच एका प्रकारात एक 70 वर्षीय कोरोना बाधीत रुग्ण महिला कोरोनाच्या वॉर्डातून बाहेर पडत तिने थेट प्रवेशद्वारावरचं ठिय्या मांडला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असे खुलेआम फिरत असतील तर कोरोनाचा प्रसार कसा रोखला जाईल असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.




ही महिला प्रवेशद्वारावर एकटीच बसलेली असल्याचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मोठी खळबळ उडाली होती. या क्लिपची दखल घेत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सदर महिलेस पुन्हा एकदा वॉर्डात भरती केले आहे. एरंडोल तालुक्यातील 70 वर्षीय महिला आणि तिचा मुलगा हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यात मुलाची प्रकृती गंभीर आहे, तर सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे. मुलगा आयसीयूमध्ये भरती आहे. महिला मात्र चालती फिरती असल्याने सदर महिला कोरोना वॉर्डात थांबत नसल्याचे निदर्शनास आले आहे.


जूनपासून शालेय वर्ष सुरु झालेच पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना


कोरोना बाधित महिलेचा बाहेर वावर
कोणाचेही लक्ष नसल्याचा अंदाज घेत सदर महिला वॉर्ड सोडून थेट रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा वर येऊन बसत होती. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा मोठा धोका यामुळे निर्माण झाला आहे. मात्र, कोरोना रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचं अनेक घटनांवरून समोर येत आहे. रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर बसलेली कोरोना पॉझिटिव्ह महिला बघून एका आरोग्य रक्षकाने तिच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी चक्क सोशल मीडियाचा आधार घेतला होता. यावेळी सदर क्लिप संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने तातडीने हालचाली गतिमान होत महिलेला तिच्या वॉर्डात भरती केले गेले. या घटनेने कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.


Unlock 1.0 | 'अनलॉक'साठी ठाकरे सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा