पंढरपूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्या महासभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना शिवसेना नेत्यांतील विसंवाद समोर आला आहे. आपल्या विधानावर ठाम राहणाऱ्या संजय राऊतांवर आपलेच वक्तव्य मागे घ्यायची नामुष्की ओढावली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णय फक्त रामदास कदम यांच्याकडे असल्याचे समोर आले आहे.
संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सभेमध्ये मोठे राजकीय प्रवेश होणार असल्याचं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. कोणाचे प्रवेश ते तुम्ही सभेवेळी पाहा असे सांगत उत्सुकता देखील वाढवली होती. मात्र या सभेत कोणतेही राजकीय प्रवेश होणार नाहीत. ही महासभा केवळ राममंदिर आणि राज्यातील दुष्काळी प्रश्नांवर असल्याचे सांगत रामदास कदम यांनी राऊतांचे विधान त्यांच्यासमोर खोढून काढले.
यावर सारवासारव करत शिवसेना पक्षप्रवेशाची मोठी यादी मातोश्रीवर गेली असून यासाठी वेगळा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचा खुलासा करायची वेळ संजय राऊत यांच्यावर आली. उद्धव ठाकरे यांच्या महासभेला काही तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेतील नेत्यांमधील विसंवाद शिवसैनिकात संभ्रम वाढवणारा आहे.
शिवसेना नेत्यांमध्ये विसंवाद, संजय राऊतांवर वक्तव्य मागे घेण्याची नामुष्की
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2018 05:33 PM (IST)
आपल्या विधानावर ठाम राहणाऱ्या संजय राऊतांवर आपलेच वक्तव्य मागे घ्यायची नामुष्की ओढावली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णय फक्त रामदास कदम यांच्याकडे असल्याचे समोर आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -