मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणेला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 09:00 AM (IST)
सांगली : मिरजमधील बलात्कार पीडित तरुणीचा आरोपी अमित कुरणेला पोलिस स्टेशन बाहेरमारहाण झाली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आरोपी अमित कुरणेसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की केली. बलात्कार पीडित तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आरोपी अमिक कुरणेला आजा बेड्या ठोकल्या. तसंच त्याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला आज पोलिस स्टेशनमध्ये नेत असताना महिला कार्यकर्त्यांनी अमितला चोप दिला, तर आई-वडिलांनाही धक्काबुक्की केली.