Miraj Kolhapur Passenger : कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून देशभरातील अनेक रेल्वे गाड्या बंद होत्या. त्यामुळे रेल्वेच्या नियमित प्रवाशांना अनेक अडचणींचा समना करावा लागला होता. परंतु, रेल्वे प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे उद्यापासून सुरू होणार आहे.  


मिरजेवरून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. अनेक प्रवाशी नोकरीसाठीही रोज मिरज ते कोल्हापूर असा प्रवास करत असतात. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे या प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली कोल्हापूर-मिरज पॅसेंजर बंद होती. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंधही हटवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर बंद असलेली मिरज-कोल्हापूर ही पॅसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यामुळे आता उद्यापासून ही पॅसेंजर सुरू होत आहे.  


असे असेल वेळापत्रक! 
 मिरज-कोल्हापूर पॅसेंजर दररोज दुपारी 2.14 वाजता मिरजेहून सुटून ती दुपारी 3.30 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. त्याबरोबरच कोल्हापूर -मिरज पॅसेंजर दररोज सकाळी 10.30 वाजता कोल्हापुरातून सुटून 11.45 वाजता मिरजला पोहोचणार आहे. 


मिरज -पंढरपूर मार्गावर पॅसेजर सुरु करण्याची मागणी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रोज रात्रीची कोल्हापूर-सोलापूर ही गाडीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळेही प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता कोल्हापूर- मिरज पॅसेंजर सुरू झाल्यानंतर कोल्हापूर-सोलापूर आणि मिरज-पंढरपूर पॅसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. 


महत्वाच्या बातम्या