Uday Samant : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प हा गुजरातला (Gujarat) गेल्यानंतर आता नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. त्यामुळं फॉक्सकॉननंतर दुसरा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. दरम्यान, 15 सप्टेंबर 2022 ला एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्यावर' राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 22 हजार कोटींचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडं पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे.
फॉक्सकॉननंतर नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता वडोदऱ्यात गेल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठत आहे. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे. आता दोन्ही सरकारं त्यांचीच असताना महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. मात्र, उदय सामंत यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्यावर' टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातच होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत माझा कट्ट्यावर
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला असला तरी येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल असे उदय सामंत म्हणाले होते. तसेच ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत (Refinery Project) गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची माहिती देखील उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली होती. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले होते.
पुढच्या काळात महाराष्ट्रात संलग्न प्रकल्प आणू
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता. त्यावेळी विरोधकांनी सरकारलर जोरदार टीका केली होती. राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. आमचं सरकार असताना हे मोठे प्रकल्प राज्यात येणार होते असंही पवार यांनी सांगितलं होते. यावेळी त्यांच्या टिकेला उदय सामंत यांनी माझा कट्ट्यावर बोलताना प्रत्युत्तर दिलं होतं. पुढच्या काळात महाराष्ट्रात संलग्न प्रकल्प आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सामंत म्हणाले होते. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये टाटा एअरबस प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या: