Uday Samant :  शिवसेना ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेस राजकीय दुटप्पीपणा करत आहे. त्यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे सांगावं? असा सवाल करत मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिलं आहे आणि टिकवलं आहे असे सामंत म्हणाले. मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असेही सामंत म्हणाले. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केलं आहे. 

Continues below advertisement

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही? हे सांगावं असा सवाल सामंत यांनी केली आहे. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी जाहीर करावं की ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायचं की नाही असे सामंत म्हणाले.  सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. लोकशाहीत आंदोलनात जायला काहीही अडचण नाही. मी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात गेले होतो. आंदोलन संपवण्यासाठी पुन्हा भेटायचं असेल तर पुन्हा भेटू असेही सामंत म्हणाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन दाखवलं आहे. उपसमितीची बैठक झाली आहे, न्या. शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. उपसमिती सकारात्मक आहे. आगीत तेल ओतण्याचे काम काही लोकांनी करु नये असे सामंत म्हणाले. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास मुदतवाढ मिळाली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी हायकोर्टाने दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange: मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली; मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सुरूच राहणार, उद्याही गर्दी होणार