Sanjay Shirsat on Bhaskar Jadhav : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हा रांगडा माणूस आहे. शिंदे साहेबांच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस असल्याचे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. तुम्ही कितीही त्याच्यात आरती ओवाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाहीत, असं चित्र तयार झालेलं आहे. तो माणूस फक्त वेळेची वाट पाहत आहे असं म्हणत संजय शिरसाठ यांनी भास्कर जाधव हे शिंदे गटात येण्याचे संकेत दिले आहेत. 


भास्कर जाधव त्यांच्याबरोबर राहणार नाहीत


भास्कर जाधव तुमच्या बरोबर राहणार नाहीत, तुम्ही कितीही तारीफ करुन, साहेब म्हणून काहीही केलं तरी आता भास्कर जाधव त्यांच्याबरोबर राहणार नाहीत हे जवळपास आता निश्चित झालं असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. भास्कर जाधव यांना तुमची भूमिका आवडत नाही हे वारंवार सांगितलं असल्याचे शिरसाट म्हणाले.  


उबाठा गट राहिला तरी कुठे?


मुंबईत जवळपास 35 नगरसेवक आले आहेत. तर संभाजीनगरमध्ये 20 ते 22 नगरसेवक आले आहेत. तसेच सहा महापौर आले आहेत. त्यामुळं उबाठा गट राहिला तरी कुठे? असा सवाल करत शिरसाट यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. येणारी सत्ता मुंबई महापालिकेसहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायच्या हा आमचा प्रयत्न राहणार आहे असं शिरसाट म्हणाले.  डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोण कुठे जाते हे करण्यापेक्षा आपला पक्ष कुठे चाललाय याकडे लक्ष द्या. पक्षाची तुमची होत असलेली वातहात थांबवा. काहीही बडबड करून पक्ष वाढत नसतो. हे त्यांना कधी कळेल देव जाणे असं म्हणत संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांवरही टीका केली. . 


लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता


लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये आमची भूमिका ही महायुती म्हणून लढवण्याची असल्याचे शिरसाट म्हणाले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, म्हणून जर एखाद्या दोन ठिकाणी आपण युती म्हणून लढलो नाही तरी त्याचा परिणाम मतदारांवर होतो असे शिरसाट म्हणाले.  मंत्री बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले की, स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय होईल. जर असे निर्णय स्थानक पातळीवर व्हायला लागले तर मग युती होणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महायुती म्हणून लढलो तर मतदार जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि ते भरभरून आपल्याला मतदान करू शकतील असे शिरसाट म्हणाले. 


आता इंडिया आघाडीचं अस्तित्व राहणार नाही


सामनाच्या अग्रलेखावर देखील शिरसाट यांनी टीका केली. ते आता एकमेकांवर काय टीका करतात त्यांचं अस्तित्व राहणार नाही. ते स्वतः आता अस्तित्व हीन झाले आहेत. इंडिया आघाडी टिकणार नाही हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे असेही शिरसाट म्हणाले.  दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवालांना कोणी सपोर्ट केला? एकानेही सपोर्ट केलेला नाही. केजरीवालांनी तुम्हाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला का? असा सवालही त्यांनी केला. इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वावरून जे काही भांडण सुरू आहे ते भांडण आता अंतकडे चाललेलं आहे. म्हणून आता इंडिया आघाडीचं अस्तित्व राहणार नाही त्यांची आता सगळी शकलं पडलेली आहे. परंतु प्रत्येक जण आता फक्त आपल्या पक्षाचा नेतृत्व वाढण्यासाठी लढाई लढत आहे असे चित्र आहे असे शिरसाट म्हणाले. 


काँग्रेसचा एकही नेता ऊबाठा गटाच्या संपर्कात नाही


सामनात काय लिहिलं आहे हे आता जाऊन राहुल गांधींना बोललं पाहिजे. राहुल गांधींना जाऊन मिठ्या मारायचे आणि एकीकडे त्यांच्यावर टीका करायची असे शिरसाट म्हणाले. मागील तीन महिन्यापासून काँग्रेसचा एकही नेता ऊबाठा गटाच्या संपर्कात नाही. म्हणून आता काँग्रेसवर टीका करतील शरद पवारांवर टीका करतील. शेवटी एक दिवस अकेला चलो ची यांची भूमिका असणार आहे असे शिरसाट म्हणाले. 


सरकारने ठरवलं तर तुम्ही सर्वजण जेलमध्ये दिसणार, शिरसाटांचा राऊतांना इशारा


तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या. तुमचं जे काही कर्तुत्व आहे आणि त्यामुळे तिथे जा. काही स्टेटमेंट करतात असे म्हणत शिरसाटांनी राऊतांवर टीका केली.  यंत्रणा कोणाच्या बांधील नाहीत. त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत. प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत बसून केली जाते. तुमच्यावर आजही अनेक केसेस आहेत. पत्राचाळीपासून ते खिचडी घोटाळ्यापर्यंत. जर सरकारने ठरवलं तर तुम्ही सर्वजण जेलमध्ये दिसणार आहात. म्हणून तुम्ही इतरांना आव्हान देण्यापेक्षा स्वतः केलेले पाप धुण्याचा प्रयत्न करत आहात अशी टिका शिरसाट यांनी राऊतांवर केली. 


 



महत्वाच्या बातम्या:


Bhaskar Jadhav : 'मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, संधी दिली नाही म्हटलं नाही, पण..'; भास्कर जाधव पुन्हा थेट बोलले!