Sanjay Shirsat : पैशांच्या बॅगेवरुन मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केलं आहे. पैशांची चिंता करु नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत असे शिरसाट म्हणाले. तसेच पैशाची चिंता नाही एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ असेही शिरसाट म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बोलतांना शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिरसाट यांनी मिश्किलपणे केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे. 

पैशांसाठी काही अडलं असं समजण्याचं काही कारण नाही

पैशांची चिंता तुम्ही करु नका, पैशांसाठी काही अडलं असं समजण्याचं काही कारण नाही असे शिरसाट म्हणाले. पैसे देनेवाले हम है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है असे शिरसाट म्हणाले. त्यामुळं पैशांची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देतो. पण पेशंट इथून हसत गेला पाहिजे असे संजय शिरसाट म्हणाले. 

संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसमोरचा व्हिडीओ व्हायरल

संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत. या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांच्यावर आज (दि.11) खळबळजनक आरोप केले होते. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप राऊतांनी केला होता. 

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय. संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. यावरुन सध्या विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

VIDEO : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांचा व्हिडीओ; संजय राऊतांचा दावा खरा ठरला?