मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही : पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2019 11:58 AM (IST)
मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.
बीड : आपण पहिल्या बॉललाच विकेट घेणार असे सांगून पंकजा मुंडे यांना टोमणा मारणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी कडाडून टीका केली आहे. मला गोपीनाथ मुंडेनी मैदानी खेळ सुद्धा कसे खेळावे लागतात हे सांगितले आहे. मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली. बंगळूर एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी होती. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. या भगिनींनी घाटनांदूर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या.