मुंबई : खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनाही कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


डॉ. भारीत पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.  


राजकीय नेत्यांभोवती कोरोनाचा विळखा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही  कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra Government) 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  


महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव
भारतात कोरोनाचा (Corona) नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशातील 24 राज्यांमध्ये 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. यातील 828 रूग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 259 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रानतर दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण जास्त आहेत. 


दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेऊन 10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot ) देण्यात येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या