Murlidhar Mohol on Supriya sule : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पुण्याला अडीच दशकानंतर प्रथमच लोकनियुक्त खासदाराला मंत्रिपद मिळालं आहे. दरम्यान, मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेत मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली होती.


ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्याने हसू येते 


पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे. मात्र, त्याचा उपयोग पुण्यासाठी झाला पाहिजे, कंत्राटदारांसाठी नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांना लगावला होता. आता मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितले की ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्याने आज अजून हसू येत आहे. कोणाच्या प्रॉपर्टी कुठे आहेत हे जनतेला माहित आहे. पुढील काळामध्ये आम्ही कार्यकर्ते जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


ते पुढे म्हणाले की, सुप्रियाताईंनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आभारी आहे. मात्र, मी उत्तर मी देण्यापेक्षा पुणेकरांनीच दिलं आहे. पुण्याची राजकीय संस्कृती आहे, 40 वर्षांनी पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे ताईंची मळमळ बाहेर आली आहे, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. त्यांच स्वप्न पूर्ण झालं नसल्यामुळे त्यांनी मला खास शुभेच्छा दिल्या आहेत.


महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही


दरम्यान, मंत्री पदावर नाराजी असल्याच्या चर्चेवर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, नाराजी आहे असं काही वाटत नाही. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर नेते बसून निर्णय घेतात, त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या