योगगुरु रामदेव बाबांसोबत मंत्री महादेव जानकरांचा योगाभ्यास!
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2016 08:36 AM (IST)
अहमदनगर: योगगुरु रामदेव बाबा, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी एकाच व्यासपीठावर केलेला योगाभ्यास नगरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अहमदनगरच्या नेवासामध्ये रामदेव बाबांच्या दूध डेअरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी योगगुरु रामदेव बाबांसह या दोन मंत्र्यांनीही योगचा सराव केला. व्यासपीठावर सदाभाऊ आणि महादेवभाऊंचा सुरू असलेला योगाभ्यास पाहून उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन झालं. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळ्या पैशावरुन आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. VIDEO