Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar : फलटणमध्ये आत्महत्या केलेली महिला डॉक्टरचा  पुतळा आपण उभा करणार असून यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही असे वक्तव्य विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निंबाळकरांवर गोरेंनी जोरदार टीका केलीय. जनतेने तुम्हाला खालून वरुन पुढून मागून सगळ्या बाजूने 40 वर्ष ओळखले आहे असे गोरे म्हणाले.  

Continues below advertisement

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर विचारले असता गोरे म्हणाले चांगल्या माणसाचे नाव घ्या 

रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याबाबत विचारले असता चांगल्या माणसाचे नाव घ्या असे सांगत राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोकं स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधत आहेत. माझं सांगणं आहे या भगिनीच्या मृत्यूच्या आडून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न करू नका,  यातून काहीही साध्य होणार नाही. जनता आता भोळी राहिलेली नाही. जनतेने गेल्या 40 वर्षात तुम्हाला पुढून मागून खालून वरून चारही बाजूने पाहिलेले आहे. त्यामुळं उगीच यात राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांना लगावला. 

नेमकं काय म्हणाले होते रामराजे नाईक निंबाळकर?

डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा फलटणचा काळा दिवस आहे. डॉक्टरचा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अर्ध पुतळा उभारणार आहे. फलटण तालुक्यातील डॉक्टरच्या आत्महत्येमुळं तालुक्यातील दहशत संपवली. नाईक निंबाळकर या ब्रँडचे वाटोळं केलं आहे. या ब्रँडला पुन्हा मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही लढत भाऊबीजेला सुरु झाली आहे. त्यामुळे मी देखील भाऊबीज साजरी करणार नाही त्या मुलीचा अर्ध पुतळा सरकारने नाही केला तर मी माझ्या स्वखर्चातून उभा करणार असे वक्तव्य माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत. वारकरी पंथाची माणसे आहेत. मी यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही. त्या मुलीची आपण सर्व आठवण ठेवा असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. महिला डॉक्टरचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालय इथं उभा राहणार असल्याचे निंबाळकर म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण! आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नाही, स्वखर्चाने पुतळा उभारणार, रामराजेंचं मोठं वक्तव्य