पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी फलटणमधील मृत महिला डॉक्टर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे (Rupali thombare) यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून दिला. त्यावेळी, पीडित कुटुंबियांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून, रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच, पुण्यातील (Pune) माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्ह करुन रुपाली ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद अधिकच टोकाला केल्याचं दिसून येतं. 

Continues below advertisement


रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होता, याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत होतं. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. माधवी खंडाळकर असं या महिलेचं नाव असून आता या महिलेने यू-टर्न घेतला आहे. 


रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील याच राजकीय डावाचा बदला घेण्यासाठी माधवी खंडाळकर यांना एक व्हिडिओ करायला लावला. रुपाली चाकणकर याच महिलांना धमक्या देतात, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. माधवी मंदार खंडाळकर या महिलेने रुपाली ठोंबरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर, माधवी यांनी माघार घेतली मात्र, या निमित्ताने रुपाली ठोंबरे आणि रूपाली चाकणकर यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांना असा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्त केलं असा हल्लाबोल रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर केला आहे. यापूर्वी देखील चाकणकरांनी अनेक महिलांना धमक्या दिल्या आणि असे व्हिडिओ तयार करायला लावले आहेत, असाही आरोप केला आहे. एवढच असेल तर ग्राऊंडवर कामानिशी लढा असं थेट आव्हानही रुपाली ठोंबरे यांनी एबीपी माझाशी बोलताना चाकणकरांना दिलं आहे. 


हेही वाचा


Madhvi Khandalkar: आधी रक्तबंबाळ अवस्थेत रुपाली पाटलांवर गंभीर आरोप; नंतर घेतला यू-टर्न, गैरसमजातून सगळं घडल्याचं दिलं स्पष्टीकरण