मुंबई : विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या पहिल्याच प्रश्नावर सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.

 

दिलीप कांबळेंच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही तेव्हा " इथे दमदाटी काय करता, सदनाबाहेर या " अशा शब्दात कांबळेंनी विरोधकांवर हल्ला चढवला.

 

कांबळेंच्या या भाषेनं विरोधक चांगलेच संतप्त झाले आणि कांबळेंच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर झालेल्या गोंधळानं आधी 15 मिनिटं आणि नंतर पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.

 

मंत्र्यांनी माफी मागावी

 

दरम्यान, मंत्री दिलीप कांबळे यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

 

दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांनीही ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचं म्हटलं.

 

दुसरीकडे फक्त मंत्र्यांनी माफी मागून भागणार नाही तर सभागृह नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस आमदार शिवाजीराव देशमुख यांनी केली.