Anil Patil on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर झोप उडाली असल्याचे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केलं आहे. बरं झालं अजित पवार आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असेही अनिल पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांनी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवली
काँग्रेसमध्ये जाण्यापासून आम्हाला लांब ठेवलं किंवा ते पाप आमच्या हातून घडू नये हा निर्णय अजित पवारांनी घेतल्याचे अनिल पाटील म्हणाले. चुकून मुकून दोन-तीन खासदार निवडून आले तर त्यांच्या आधारावर देशाचे राजकारण होऊ शकत नाही असेही पाटील म्हणाले. त्यामुळं संजय राऊत यांना हाताशी धरुन शरद पवारांनी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवली आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत शरद पवारांनी दिल्याचे अनिल पाटील म्हणाले.
सुनेत्रा पवार निवडून येणार
बारामती मतदारसंघात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. आजूबाजूच्या वस्तींचे मतदान मात्र कमी झालेले आहे. बारामतीकरांचा अजितदादांवर विश्वास असल्याचे अनिल पाटील म्हणाले. पुढील 25 वर्ष अजित पवार यांच्याबरोबर बारामतीतील विकास गंगा वाहून द्यायची आहे, हा विश्वास असल्यानं सुनेत्रा पवार निवडून येणार असल्याचे अनिल पाटील म्हणाले.
सुप्रिया सुळे अजित पवारांकडे का गेल्या हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न
सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजित पवारांकडे (Ajit Pawar) का गेल्या हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न असल्याचे अनिल पाटील म्हणाले. अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांचे स्वागतच केल्याचे पाटील म्हणाले. अजित पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये संस्कृती कायम राहिलेली आहे. त्या कशासाठी तिथं गेल्या याचं विश्लेषण सुप्रिया सुळे यांनी केलं असल्याचे अनिल पाटील म्हणाले. कुटुंबात एकमेकांचे संबंध चांगले असले पाहिजेत, त्याला कोणाचाही विरोध असणार नाही असेही अनिल पाटील म्हणाले. संभ्रम निर्माण होईल अशी स्थिती नाही, मतदार हुशार झाला असल्याचे पाटील म्हणाले. कौटुंबिक संबंध जपण्याच्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळेंनी ते उचललेले पाऊल असेल असंही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: