सिंधुदुर्ग :  एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या नोटिशीवरुन राणे कुटुंबीय आक्रमक झाले असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राणेंच्या बालेकिल्ल्यात असतील. आदित्य आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर आहेत. आधी म्याव म्याव प्रकरण आणि त्यानंतर संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं लक्ष लागलं आहे.

  


महापालिकेचं पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत जुहू इथल्या बंगल्यावर


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडलीय. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का ? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


ठाकरेंकडून रंकाळा तलावाची पाहणी


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल रात्री अकरा वाजता कोल्हापुरात रंकाळा तलावाची पाहणी केली.  आज अंबाबाईचे दर्शन घेऊन आढावा बैठकीला सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे.  



इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha