Abdul Sattar on Amol Mitkari : अमोल हा अनमोल नाही बेमोल आहे, त्याची चर्चा आपण करावी एवढा तो मोठा नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. तसेच जे लोक हँग झाले आहेत ते टीका करण्याचं काम करत असल्याचे ते म्हणाले. अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा चांगलाच समाचार घेतला.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारु पिता का? असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच यावरुन अमोल मिटकरी यांनी देखील सत्तार यांच्यावर टीका केली होती. सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर अब्दुल सत्तार यांनी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे.
त्यांच्याकडे काहीच काम उरलं नाही, सत्तारांचा विरोधकांवर निशाणा
आम्ही जेव्हा राज्यात फिरत असतो तेव्हा कुठे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर बसल्यानंतर हसी मजाक करत असतो. आता हसी मजाकमध्ये केलेली गोष्टसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही पोस्ट करुन व्हायरल करायचं काम हँग झालेले लोक करत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांच्याकडे काहीच काम उरलेले नाही, त्यामुळं त्यांना ते करु द्या, असे प्रत्युत्तर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना दिलं. एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनाही त्यांनी चोख प्रतिउत्तर दिलं. अमोल हे काय अनमोल नाहीत ते बेमोल आहेत. त्यामुळं त्या त्यांची चर्चा करावी एवढे ते मोठे नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले होते सत्तार
गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा देत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं. आता हाच व्हिडिओ सचिन सावंत यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: