औरंगाबाद : एमआयएमच्या विरोधामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला. तस्लिमा नसरीन या अजिंठा-वेरूळ या पर्यटनस्थळाला पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या.
तस्लिमा नसरीन जेव्हा औरंगाबाद विमानतळावर उतरल्या, त्याचवेळी विमानतळाबाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि तस्लिमा नसरीन यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तस्लिमा नसरीन यांना परत जाण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तस्लिमा नसरीनसुद्धा माघारी फिरल्या.
मूळ बांगलादेशच्या असणाऱ्या तस्लिमा नसरीन स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांच्या लिखाणावरुन अनेकदा वादही झाले आहेत.
अजिंठा-वेरुळ पाहण्यासाठी आलेल्या तस्लिमा नसरीन यांना MIM चा विरोध
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
30 Jul 2017 08:13 AM (IST)
एमआयएमच्या विरोधामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला. तस्लिमा नसरीन या अजिंठा-वेरूळ या पर्यटनस्थळाला पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -