औरंगाबाद : खासदार चंद्रकांत खैरेंनी कन्नड तालुक्यातील विविध विकासकामांवर खर्च दाखवलेला निधी कागदोपत्रीच खर्च झाला आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या कमिटीनं याबाबतचा निर्णय दिला आहे.
या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एस. डी. एम.चा पक्ष अहवाल माझाच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता शिवसेना खासदार खैरेंवर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चंद्रकात खैरे गेल्या 20 वर्षांपासून हे औरंगाबादचे खासदार आहेत. त्यांच्या मतदार संघातील कन्नड तालुक्यात 2014-15 मध्ये 14.99 लाख रुपये निधी खर्च केला. 2015-16 साली जवळपास 2 कोटी, तर 2016-17 मध्ये 2 कोटी 40 लाखांचा निधी खर्च केल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे, या सर्व निधीची कामं एकाच कंत्राटदाराने केल्याचंही सादर केलेल्या कागदपत्रातून समोर आलं होतं.
एबीपी माझानं खैरेंच्या कारभाराची पोलखोल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली. या समितीनच्या सखोल चौकशीमध्ये खैरेंचा खासदार निधी केवळ कागदावरच खर्च झाल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या
अस्तित्वात नसलेल्या गावासाठी निधी खर्च, शिवसेना खासदाराची करामत
खासदार चंद्रकांत खैरेंचा 'तो' निधी फक्त कागदोपत्रीच खर्च झाला!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
29 Jul 2017 11:18 PM (IST)
खासदार चंद्रकांत खैरेंनी कन्नड तालुक्यातील विविध विकासकामांवर खर्च दाखवलेला निधी कागदोपत्रीच खर्च झाला आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या कमिटीनं याबाबतचा निर्णय दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -