पालघर : कामगार कल्याण मंडळाकडून असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आलोंडा आणि उटावली या दोन ग्रामपंचायतीमधील 1 हजार 150 रोजगार हमी योजनेतील कामगारांनाही मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. रोजगार हमी योजनेतील कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांसाठी दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था शासनाकडून केली जाते. पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार, मोखाडा या तालुक्यांमध्ये स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. मात्र रोजगार हमी योजनेमुळे स्थलांतराचे प्रमाण आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र हे स्थलांतर पूर्णपणे थांबवायचे असेल तर या रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना जेवणाची व्यवस्था करावी लागेल, ही संकल्पना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा या रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजूरांची नोंदणीकृत मजूर म्हणून त्यांची कामगार आयुक्तालयात नोंद केली. त्यानंतर आता विक्रमगड तालुक्यातील आलोंडा येथील गुनगूनपाडा येथे या योजनेचा शुभारंभ पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तसेच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.


मजूरांना जेवनाची 'हमी'


या योजनेमुळे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय होणार असल्यानं रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या देखील वाढेल आणि स्थळांतरावर आला बसून नक्कीच कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha