Maharashtra Weather : हवामान विभागानं (IMD) आजही राज्यात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert for rain) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


सध्या राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झालीय. तर काही भागात सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं आजही राज्याच्या काही भागात जोरदार पावासाचा इशारा दिला आहे. मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मजल मारली आहे. मात्र, विदर्भात मान्सूनची वाटचाल मंदावलेली दिसत आहे. संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास आणखी तीन चार दिवस लागण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 


'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा (Heavy Rain)


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तुन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  


मान्सूनने (Monsoon) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे. तर विदर्भाच्या काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भाच मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, अद्याप मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 14 जूनपर्यंत या भागात मान्सूनची वाटचाल सुरु होती. मात्र, त्यानंतर या भागातील मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या: 


ठाणे, मुंबईत पावसाचा यलो अलर्ट! विदर्भ, मराठवाड्यात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा