काही दिवसांपूर्वी जेव्हा म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली, तेव्हा त्यात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना घरे उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी 50 हून अधिक घरांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या गटासाठी किती घरं असतील?
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – 50 हून अधिक घरं
- अल्प उत्पन्न गट (LIG) – 322 घरं
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – 226 घरं
- उच्च उत्पन्न गट (HIG) – 168 घरं
उत्पन्न गटांची विभागणी कशी असते?
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – 25 हजाराहून कमी मासिक उत्पन्न
- अल्प उत्पन्न गट (LIG) – 25,001 ते 50 ,0001 पर्यंत मासिक उत्पन्न
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – 50,001 ते 75,000 पर्यंत मासिक उत्पन्न
- उच्च उत्पन्न गट (HIG) – 75 हजाराहून अधिक मासिक उत्पन्न
कोणत्या उत्पन्न गटासाठी किती डिपॉझिट?
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – 15 हजार रुपये
- अल्प उत्पन्न गट (LIG) – 25 हजार रुपये
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – 50 हजार रुपये
- उच्च उत्पन्न गट (HIG) – 75 हजार रुपये