पुण्यात पुन्हा जळीतकांड, 26 दुचाकी जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2017 07:44 AM (IST)
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळल्याचा प्रकार घडला आहे. पर्वती परिसरात मैदानात पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि चारचाकी अज्ञातानं जाळल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस चौकीजवळच हा सर्व प्रकार घडला आहे. पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ मैदानात पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि एक चारचाकी अज्ञातानं जाळल्या. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळची ही घटना आहे. पोलीस चौकीजवळच हा प्रकार घडला असून या जळीतकांडामागे कुणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पुण्यात याआधीही गाड्या जाळण्याचे प्रकार झाले आहेत. यात पिंपळे गुरवमध्ये एका सोसायटीमध्ये सहा गाड्या, उत्तमनगर परिसरात 7 दुचाकी वाहनं, सिहगड रोडवर वेगवेगळ्या सोसायटीमधे किमान ८० ते ९० दुचाकी व चारचाकी गाड्या पेटवण्यात आल्या होत्या. संबंधित बातम्या :