पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
VIDEO | गल्ली ते दिल्ली दिवसभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा | बातम्यांचं अर्धशतक | ABP Majha
काल रात्री पासून मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं आहे. ठाणे स्थानकाच्या दोन्ही एन्ट्री पॉईंटला पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पाऊसाचा जोर जर असाच चालू राहिला मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहे. या पावसामुळे रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे.
Mumbai Rains | खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेच्या शाळांना आज सुट्टी जाहिर | ABP Majha