इंदापूर : माजी सहकार मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. आज दुपारी एक वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी संकल्प मेळावा आयोजित केला आहे. जनता जे सांगेल तो निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.
हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. काँग्रेसच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अनेक वेळा आले होते. असे असूनही पक्ष त्यांचा विचार मात्र सध्या करत नसल्याचे त्यांच्या कार्यकर्ते म्हणणे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीत मतदार संघात सुप्रिया सुळे यांना पाटील यांनी मदत केली होती. स्वतः अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांची मनमानी केली होती. शरद पवार यांनीही पाटील यांच्याशी चर्चा केली होती. यात पवार यशस्वी झाले होते. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातील 70 हजारांचे मताधिक्य मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसचाही मोठा वाटा होता.
दरम्यान शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याच्या विधानसभेची उमेदवारी देणाच्या शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
2014 चा अपवाद वगळता 1952 सालापासून इंदापूर तालुक्यावर काँग्रेसची सत्ता ठेवण्यात हर्षवर्धन पाटील व पाटील घराणे सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. मात्र 2019 ची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील हे आज काँग्रेसला रामराम ठोकणार अशी चर्चा आहे. आजच्या मेळाव्यात जो निर्णय होईल तशीच राजकीय दिशा ते ठरवणार आहेत. यात ते भाजपात जाण्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे याचे काँग्रेसला मोठे नुकसान तर होणार आहे शिवाय भाजपला पुणे जिल्हात मोठा नेता मिळू शकतो. भाजप हर्षवर्धन पाटील यांचा पवारांच्या विरोधात राजकीय अस्त्र म्हणून वापर करेल अशीही शक्यता आहे. पाटील यांनी बारामतीच्या पवारांच्या विरोधात आजपर्यंत कधीच उघड राजकीय भूमिका घेतली नव्हती पण आजपासून ते बारामतीच्या पवारांच्या विरोधात दंड थोपाटणार का? हे पाहावे लागेल.
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार, दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांसोबत संकल्प मेळावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2019 12:01 PM (IST)
शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याच्या विधानसभेची उमेदवारी देणाच्या शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -