स्मार्ट बुलेटिन | 04 सप्टेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2019 10:19 AM (IST)
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
विधानसभेच्या रणनीतीवर रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं, भाजप कोअर कमिटीची चर्चा तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, भिवंडीत पाणी साचलं, सध्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत जीडीपीची घसरण आणि वाहन कंपन्यांच्या विक्रीत झालेल्या घटीचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 800 अंकानी घसरला राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप, नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवारी शरद पवारांना सवाल विचारणाऱ्या अमित शाहांना रोहित पवारांचं उत्तर, भाजप नेत्यांना डबल ढोलकीची उपमा लालबागच्या राजाच्या दानपेटीत भक्तांच्या इच्छांचा महापूर, चांगल्या बायकोपासून ते बिअर शॉपीचं लायसन्स मिळण्यासाठी बाप्पाला साकडं दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप, पुण्यात कृत्रिम तलावांचा वापर, तर गणपती दर्शनासाठी नेत्यांनी चढली विरोधकांच्या घराची पायरी मुंबईलगतच्या उरणमधील ओएनजीसी प्लांटची आग आटोक्यात, चौघांचा मृत्यू, गळतीमुळं लगतच्या वस्तीलाही आगीच्या झळा मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक, राजकीय वैमनस्यातून अटक झाल्याची काँग्रेसची टीका मिताली राजचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 2021 सालचा वन डे विश्वचषक मितालीचे लक्ष्य