Hasan Mushrif on Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं थेट आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार (Aji Pawar on Amol Kolhe) यांनी दिल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. यानंतर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आव्हान स्वीकारत अजितदादांनी माझं सुद्धा आव्हान स्वीकारावं असं प्रतिआव्हान दिलं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील कलगीतुरा रंगला असतानाच आता अजित पवार गटाचे मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आता अमोल कोल्हे संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. 


मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं अनेकदा सांगितलं


मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, अमोल कोल्हे यांनी मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. मुश्रीफ म्हणाले की, माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. तसेच खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होत आहे असं मला ते खासगीमध्ये अनेकदा म्हणाले आहेत, त्यामुळे अजितदादा कोणत्यातरी कारणाने नाराज झाले असावेत असं मला असं वाटतं. त्यामुळेच त्यांनी त्या पद्धतीची भाषा केली असावी असही ते म्हणाले. 


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळालं नसल्याचे म्हटलं आहे. मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,शरद पवार यांनी अनेकवेळ नास्तिक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी जावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.


शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्या मंत्रिपदावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेताना मंत्रिमंडळ विस्तार संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असे ते म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसची महारॅली नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की आता देशामध्ये नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील भारत दौरा केला. तरीही आत्ताच्या निवडणुकीत त्यात त्यांचा करिष्मा दिसला नाही, असा टोला त्यांनी लगावला.


सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडतोय


दरम्यान, एबीपी माझासोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडतोय. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होतेय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा ही वाचला. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं कोल्हे म्हणालेत.  


इतर महत्वाच्या बातम्या