कोल्हापूर : आजपर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात तो हे आपण पाहिलेलं आहे, 2024 मध्ये मोदींना कोणी आडवू शकणार नाही, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या जनमत चाचणीत (Lok Sabha Election 2024 Opinion Poll ABP C Voter survey) राज्यात महायुती सरकारला तगडा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे.  दुसरीकडे, महाविकास आघाडी विस्कळीत दिसत असतानाही एक प्रकारे बुस्टर डोस मिळेल, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी दावा केला.  


खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेलाही हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने प्रचंड निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे काम आहे टीका करणे मात्र आम्ही काम करत राहू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.


प्रोत्साहनपर अनुदानावर काय म्हणाले?


एकावर्षी दोनवेळा पीक कर्ज घेतलं आहे ही तांत्रिक बाब आली आहे मात्र सर्वांना मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, असेही ते म्हणाले. 


खासदार मुन्ना झाले हसन मुश्रीफांचे सारथी


दरम्यान, जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज (25 डिसेंबर) धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसले होते. त्यामुळे या नव्या जोडगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली. काल (24 डिसेंबर) हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. याबाबत विचारण्यात आले असता मुश्रीफ म्हणाले की, मी खासदार महाडिक यांच्या मागे बसून बुलेट सवारी केली आहे. आमची भूमिका ज्यांच्याबरोबर राहू ते निष्ठेने अशी आहे. 


महाराष्ट्राचा ओपिनियन पोल - कोणाला किती जागा?


दुसरीकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.


इतर महत्वाच्या बातम्या