मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीआहे. तिकडं विदर्भावर मात्र आभाळमाया कायम आहे. चंद्रपूर, बुलडाणा आणि अकोला परिसरात कालपासून संततधार कायम आहे. जून महिना संपत आला तरी पावसानं म्हणावा तसा जोर न दाखवल्यानं शेतकरी चिंतेत होता. मात्र कालपासून पावसानं आपला रंग दाखवल्यानं बळीराजा सुखावला आहे.

 

अपडेट:

 

धुळे - साक्री तालुक्यात एक तासापासून पाऊस, बेहेड, निळगव्हाण, विटाई, नाडसे, छाईल, प्रतापूर परिसरात मुसळधार पाऊस