मुंबई : महाराष्ट्र राज्य हमाल-माथाडी महामंडळाने आज विविध मागण्यांसाठी बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. सर्व माथाडी कामगारांसाठी सार्वत्रिक पेन्शन सुरु करावी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव द्यावा, युवकांना रोजगार मिळावा, माथाडी हमाल-कामगार कायदयांसारखे संरक्षण मिळावे, दुष्काळ निवारण्यासाठी सर्व समावेशक समित्यांची स्थापना सरकारने करावी, अशा विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन करण्यात आले आहे.


राज्यातील माथाडी कामगार कायद्याला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यंदा माथाडी कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी मागणीदेखील कामगारांनी मांडली आहे.

माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी कायदा नष्ट करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याने त्याच्या निषेधार्थ पुणे, नाशिक, मनमाड, नवी मुंबई आणि नागपूर येथील बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. आज मुंबई येथील आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात अंदाजे 1000 कामगार सहभागी झाले असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

या ठिकाणी बंद
पुणे येथील गुलटेकडी मार्केटयार्ड, सांगली कृषी उत्त्पन्न बाजार समिती, नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसभर बंद पाळण्यात आला.

वाचा : नवी मुंबईतले एपीएमसी मार्केट आज बंद