बुलडाणा : 40 एकराचा परिसर, 53 पंगती, 2,00,000 लोकांचं जेवण. विशेष म्हणजे कोणतीही अस्वच्छता नाही. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात हिवरा आश्रममध्ये गेल्या 50 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विवेकानंद जन्मोत्सवाची लाखोंच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी सामूहिक भोजनादरम्यान सामूहिक शिस्तीची भक्ती दिसली.

बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी दर वर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाप्रसादाने सांगता होणारा हा उत्सव तीन दिवस चालतो. यामध्ये 500 क्विंटलचा महाप्रसाद बनवला गेला. ज्यामध्ये पुरी आणि वांग्याची भाजी असा बेत होता. यंदा या महाप्रसादाला 50 हजार महिला आणि मुलींनी महाप्रसाद वाढण्याचे काम केले, तर जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.



बुद्धिवंतांच्या कपाटात बंदिस्त असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांना व्यावहारिक पातळीवर आणून सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी विवेकानंद आश्रमाची स्थापना झाली. प.पु. शुकदास महाराज विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंदांची जयती अत्यंत भव्य स्वरुपात साजरी केली. अंधश्रद्धेला नाकारुन विवेकाची पेरणी इथे केली जाते.

गेल्या 50 वर्षांपासून विवेकानंद यांचा जन्मोत्सव हिवरा येथे साजरा करत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अशाच प्रकारे लाखो भाविकांना महाप्रसदाच्या रुपाने जेवण दिले जाते.

संबंधित बातम्या :