वाईट स्वप्नांनी जीव घेतला, विवाहितेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली

महिलेला गेल्या काही महिन्यांपासून भीतीदायक स्वप्न पडायची. त्यामुळे त्या मनातून खचल्या होत्या. यासाठी तिच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र तरी देखील त्यांनी काल रात्री घराचा दरवाजा बंद करून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

Continues below advertisement
नाशिक : वाईट स्वप्न पडतात म्हणून एका विवाहितेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्यामागे अन्य काही कारण होते का याचा पोलीस शोध घेत आहेत. जयश्री भगत असे या महिलेचे नाव आहे. पाथर्डी गाव परिसरात राहणाऱ्या जयश्री भगत या महिलेला गेल्या काही महिन्यांपासून भीतीदायक स्वप्न पडायची. त्यामुळे त्या मनातून खचल्या होत्या. यासाठी तिच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र तरी देखील त्यांनी काल रात्री घराचा दरवाजा बंद करून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात त्या 90 टक्के भाजल्या. त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील माहेर असणाऱ्या जयश्री यांचं सासर त्रंबकेश्वर तालुक्यात आहे, पतीच्या नोकरी निमित्ताने ते नाशिक शहरात आले होते. अनेकांना अशा स्वरूपाचे आजार असतात भीतीदायक स्वप्न पडत असतात. त्याला विचार करणे, चिंता करणे किंवा मानसिक दडपण घेणे अशी कारणे असू शकतात. अशा रुग्णांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर इलाज करणे, मनातील भीती घालविणे महत्वाचे असल्याचं मानसोपचार तज्ञांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola