छत्रपती संभाजीनगर: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक झाली, त्या संभाजीनगर जिल्ह्याला या बैठकीत नेमकं काय मिळाले याची देखील चर्चा आहे. तर, या बैठकीत संभाजीनगरसाठी एकूण 15 घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याचा विकास कामात भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या घोषणा?
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार असून, यासाठी 150 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
- वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा होणारा असून, यासाठी 1793 हे. क्षेत्र सिंचित होणार आहे. यासाठी 285 कोटी 64 लाखांची घोषणा करण्यात आली आहे.
- वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखड्यासाठी 156 63 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
- सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या 45 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली असून, 656.38 कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे.
- छत्रपती संभाजीनगरच्या फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानउ भारणार असून, प्रत्येकी 50 कोटी खर्च केले जाणार आहे.
- छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच, मिल कॉर्नर येथील निवासस्थाने यासाठी 191 कोटी 65 लाखांची घोषणा करण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक 1197 ई-बसेस चालवल्या जाणार असून, यासाठी 421 कोटीस मान्यता देण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार असून, यासाठी 135.61 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
- राज्यातील 9 राष्ट्रीयमहामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार असून, पुणे- छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 188.19 कोटी खर्च येणार आहे.
- छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथप्रकल्प केले जाणार असून, यासाठी 10.37 कोटींचा खर्च येणार आहे.
- केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये 2740.75 कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प, रुपये 275.68 कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प, तर रुपये 2.78 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प, असे एकूण रुपये 3059.21 कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
- खुलताबाद शहरासाठी रुपये 21.32 कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
- छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय केले जाणार आहे.
- छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathwada Cabinet Meeting : नव्या बाटलीत जुनीच दारू, सरकारच्या घोषणांवरून अंबादास दानवेंची टीका